Ad Code

Ticker

6/recent/ticker-posts

गडचिरोली जिल्ह्यातील मैदान गाजवणारी अकॅडमी, Zig - Zag Sports Academy

गुलाब सर, हे नाव आहे जे आज अनेक पोलीस शिपाई पदावर कार्यरत असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हृदयात वास करतो. नेमका हवा असणारा मैदानी चाचणीतील शिक्षक गुलाब सरांसारखेच असावे कारण, आपल्या विद्यार्थ्यांत असलेली उणीव शोधून काढून त्यावर काम करण्याची कला त्यांना बरीच उमजली आढळते. त्यामुळेच आज हि अकॅडमी व गुलाब सर प्रकाशझोतात येत आहेत. 



सन २०१६ - १७ काळात पोलीस शिपाई भरती झाली त्यावेळेस बरेच युवक, युवती ज्या अनेक ठिकाणाहून शिकण्यास गडचिरोली जिल्ह्यात पदार्पण केलेल्या होत्या. कोटगल एम. आय. डी. सी. या परिसरातल्या ग्राउंड वर या सर्व स्पर्धकांची तयारी सुरु असते. याच काळात आपले बीपीएड शिक्षण घेत गावातीलच तरुणांना मैदानी चाचणीसाठी तयार करवून देणारे गुलाब मेश्राम सर, हे त्या युवकांच्या नजरेत आले. त्या काळात मैदानी चाचणी शिकविणारे शिक्षक बोटावर मोजण्याइतके होते. त्यामुळे त्या मुलांनी गुलाब सरांकडे बरेच विद्यार्थी येऊ लागले. याच काळात जिल्ह्यातील लेखी परीक्षेची तयारी करवून देणारे स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या सुद्धा निदर्शनास गुलाब सर आले तेव्हा त्यांनीही आपले विद्यार्थी गुलाब सरांकडेच पाठविले. अशा प्रकारे गावातील मुले असोत, विविध स्पर्धा परीक्षा केंद्राचे अथवा बाहेरील दुर्गम भागातील मुले गुलाब सरांकडे मैदानी चाचणीचे धडे घेऊ लागली. 



२०१७ मधील पोलीस भरतीचा निकाल लागला त्यावेळेस अनेक स्पर्धा परीक्षा, अनेक गावात, शहरात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे पोस्टर लागले तेव्हा सर्वात मोठी लिस्ट मधे  गुलाब सरांच्या मार्गदर्शनात शिकलेली मुले दिसत होती. त्यानंतर प्रत्येक वर्षी होत गेलेल्या पोलीस शिपाई भरतीत त्यांचे विद्यार्थी चमकत आहेत.

इतके भव्यदिव्य  कार्य असले तरीही ते एका बाबतीत मागे राहतील अशी खंत आहे ती म्हणजे अनेक गरजू विद्यार्थ्यांपर्यंत ते अद्याप पोहचू शकले नाही. म्हणूनच अनेक युवक व युवती योग्य मार्गदर्शनापासून वंचित आहेत  असे वाटते. 

म्हणूनच, आम्ही ह्या  प्रखर व्यक्तिमत्वाचे इंटरव्हू घेतले आहे व ते लवकरच आपल्या You Tube चॅनेल ला प्रकाशित होत आहे . हि अकॅडमी जिल्ह्यातील होतकरू युवक, युवतीपर्यंत पोहचने खरच हिताचे आहे. 

यात त्यांच्या अकॅडमीचे नाव, ध्येय, ठिकाण आणि कोणत्या युवकांना मोफत व प्रशिक्षण केव्हा सुरु होईल याची सविस्तर माहिती घेऊया. 

( चॅनेल लिंक साठी  आमच्या site  मध्ये Youtube हे आयकॉन स्वतंत्र दिसेल )

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या